अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :-एका युवकावर जुन्या वादाच्या कारणावरून जीवघेणा हल्ला झाला आहे. दरम्यान हा धक्कादायक प्रकार सोनई जवळील हनुमानवाडी येथील शनिचौकात घडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, जुन्या वादाचा बदला म्हणून सागर रामचंद्र कुसळकर (रा.हनुमानवाडी शिवार) या युवकावर तलवार, चाकू, कुर्हाड व लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली.
या मारहाणीत कुसळकर यांच्या हातावर व पायावर खोलवर जखमा झाल्या आहेत. याप्रकरणी सागर कुसळकर यांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पैकी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांची नावे :– अमोल राजेंद्र शेजवळ, राहुल चांगदेव शिंदे, अमोल अशोक गडाख (सर्व रा. सोनई), अक्षय रामदास चेमटे (रा. घोडेगाव) या चौघावर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल शिंदे यास अटक करण्यात आली असून अन्य आरोपी इतर गुन्ह्यात असल्याने अटक झालेली नाही. सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.