अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-महावितरण कंपनीने थकीत वीज बिल वसुलीस गती दिली असून घरोघर जाऊन ते वीज खंडित करण्याचा धाक दाखवून वीज बिल भरण्यास धमकावत आहेत.
अशीच वसुली करताना वीज ग्राहक व महावितरणच्या अधिकाऱ्यां कडाक्याचे भांडण झाल्यावर ते पोलीस ठाण्यात पोहचवून सरकारी कामात अडथळा निर्माण करून
जिवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल अकोल्यातील महालक्ष्मी कॉलनीतील रहीवासी व सामाजिक कार्यकर्ते मिलींद रूपवते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपीस गजाआड करण्यात आले.
पोलिस ठाण्यात महावितरणचे अकोले शाखेतील सहाय्यक अभियंता गिरीश मूळे, शहर कक्ष अधिकारी नम्रता जाधव, मनीषा तोडमल, वीज कर्मचारी नारायण मेंगाळ, भूषण सपकाळे उपस्थित होते. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक दीपक ढोमणे यांनी आरोपीस अटक केली.