अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-एका खासगी प्रयोगशाळेत स्वॅब देऊन ४० वर्षीय महिला कार चालवत घरी जात होती. त्याचवेळी प्रयोगशाळेतून महिलेला कॉल करण्यात आला.
चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं समोरील व्यक्तीने महिलेला सांगितलं. हे ऐकून कार चालवत असलेल्या महिलेला धक्काच बसला.
त्यातच महिलेचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार रस्त्याकडेला असलेल्या विजेच्या खांबावर जाऊन आदळली आणि यात महिला जखमी झाली. ही केरळमधील कोल्लम जिल्ह्यात असलेल्या कडक्कलमध्ये सोमवारी घडली.
अपघातानंतर महिला कारमधून बाहेर आली आणि रस्त्यावर येऊन बसली. महिलेच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या. अपघातग्रस्त गाडीतून उतरून महिला रस्त्यावर येऊन थांबली. नंतर अग्निशमन दलाच्या अधिकारी घटनास्थळी पोहोचले.
अधिकाऱ्यांनी महिलेला पीपीई किट दिली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या २४ तासांतील आकेडवारी जाहीर केली आहे. केंद्रानं जाहीर केलेली ही आकडेवारी भयावह आहे. देशात २४ तासांत १ लाख ८४ हजार ३७२ करोना बाधित आढळून आले आहेत.
तर १ हजार २७ जणांचा मृत्यू झाला आहे. याच कालावधीत ८२ हजार ३३९ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. देशात आतापर्यंत १ लाख ७२ हजार ८५ जणांचा मृत्यू झाला असून, सध्या १३ लाख ६५ हजार ७०४ रुग्ण उपचार घेत आहेत.