Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Asus Smartphone : अखेर लॉन्च झाला Asus चा तगडा फोन, मिळणार शानदार फीचर्स, जाणून घ्या किंमत

Asus चे दोन शानदार फोन लाँच झाले आहेत. दरम्यान कंपनी अनेक दिवसांपासून या फोनवर काम करत होती.

Asus Smartphone : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन विकत घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता Asus ने आपले दोन नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीचे चाहते अनेक दिवसांपासून या फोनची वाट पाहत होते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कंपनीने शानदार फीचर्ससह आज हा फोन लाँच केला आहे. जर या दोन्ही फोनच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर 12GB रॅमसह 256GB स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत 74,999 रुपये तर 16 GB रॅम आणि 512 GB स्टोरेज सह 99,999 रुपये इतकी आहे.

Asus ROG Phone 7 या सिरीजमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये 50MP Sony IMX766 प्राथमिक सेन्सर, 13MP अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 8MP मॅक्रो लेन्सचा समावेश असून हा आगामी फोन GPS, NFC, Bluetooth v5.3 आणि Wi-Fi समर्थित असणार आहे. स्टोरेजचा विचार केला तर हा 16 GB पर्यंत LPDDR5X RAM आणि 512 GB पर्यंत UFS4.0 अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज असणार आहे.

किती आहे किंमत ?

कंपनीच्या आगामी ROG Phone 7 फोनच्या 12GB रॅमसह 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 74,999 रुपये इतकी आहे. तर तो Asus ROG Phone 7 Ultimate Storm White या रंगात येतो. हा फोन ग्राहकांना 16 GB रॅम आणि 512 GB स्टोरेज सह 99,999 रुपये किमतीत खरेदी करता येणार आहे. हे लक्षात घ्या की दोन्ही फोन पुढील महिन्यात खरेदीसाठी उपलब्ध केले जाणार आहेत.

बॅटरी बॅकअप जाणून घ्या

कंपनीचे दोन्ही फोन 65W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,000mAh बॅटरी युनिट पॅक करत असून हे फोन ड्युअल नॅनो सिम सपोर्टसह येत आहेत. अँड्रॉइड 13 आधारित ROG UI आणि Zen UI अनुक्रमे दोन्ही फोन्समध्ये देण्यात आले आहेत.