अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :- सर्व अफवांना विराम देत गायक-अभिनेत्री जेनिफर लोपेझ यांनी तिच्या वाढदिवशी सोशल मीडियावर हॉलिवूड स्टार बेन एफलेकबरोबरच्या नातेसंबंधांची अधिकृत घोषणा केली.
फोटोंने इंटरनेट हालले लोपेझ यांनी रविवारी इन्स्टाग्रामवर तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो पोस्ट केले. एका चित्रात लोपेझ आणि एफलेक किस घेताना दिसत आहेत.
मजेदार कॅप्शन – ’52, यह क्या हो रहा है’ असे या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. आतापर्यंत 5.2 मिलियन लाईक्स फोटोवर आल्या आहेत.
जेलो खूप सुंदर दिसत होती वयाच्या 52 व्या वर्षीही लोपेझ तिच्या लेटेस्ट फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
असे आहे जेलोचा लूक – लाल आणि पिवळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये ती यलो कव्हर अप आणि स्ट्रॉ हॅटसह आपल्या परफेक्ट ऑवरग्लास बॉडीला फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
आधी प्रेमसंबंध होते – 2001 च्या उत्तरार्धात ‘गिगली’ च्या सेटवर भेट झाल्यानंतर लोपेझचे 2002 ते 2004 च्या सुरुवातीस एफिलेकशी संबंध होते. त्यानंतर 2004 मध्ये ते वेगळे झाले.