अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :- हे पाय आहेत जमिनीवरचे… आणि याच जमीनीतील मातीचा टिळा आहे भाळी, त्यामुळं आज दुखलेत, सुजलेत, रक्ताळलेत, पण थांबले नाही आणि थांबणारही नाहीत कधी,
कारण या पायात आहे महाराष्ट्राच्या प्रेमाचं रक्त जे कधीच आटणार नाही, अशा शब्दांत एका कार्यकर्त्यांनं आपल्या भावना व्यक्त केल्याचं आमदार रोहित पवारांनी शेअर केलं आहे.
शरद पवार होणं हे कुणाचंही काम नाही, अशा भावना एका कार्यकर्त्यानं व्यक्त केल्या आहेत. या् पायाच्या प्रत्येक रेषेला लागलेली आहे महाराष्ट्राच्या अक्षांश रेखांशावरील माती,
किल्लारीचा भूकंप असो की कोल्हापुरचा महापूर..संकटांच्या मानगुटीवर उभं राहून दिलासा द्यायला हेच पाय धावले, याच पायांना दररोज झाल्या कितीही जखमा, खांद्यावर आलं कितीही ओझं, तरी त्यांनी कधी केली नाही तक्रार,
किती आले किती गेले, पण सह्याद्रीचा हा चिरा भक्कम आहे, अशा शब्दांत एका कार्यकर्त्यांनं आपल्या भावना व्यक्त केल्याचं रोहित पवारांनी शेअर केलं आहे. दरम्यान,
शरद पवार यांना सोमवारी पित्ताशयाचा त्रास झाला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करुन शस्त्रक्रिया करण्यात आली.