Ather 450X : नवीन एथरची इलेक्ट्रिक स्कूटर Ola वर पडणार भारी! सिंगल चार्जवर मिळणार 146 किमीची जबरदस्त रेंज, जाणून घ्या किंमत
एथरची नवीन Ather 450X इलेक्ट्रिक स्कुटर मार्केटमध्ये दाखल होणार आहे. ती Ola ला कडवी टक्कर देऊ शकते.
Ather 450X : देशात पेट्रोलच्या किमती वाढल्यापासून आता अनेक कंपन्या इलेक्ट्रिक बाईक तसेच इलेक्ट्रिक स्कुटर लाँच करत आहेत. या सर्वच स्कुटरमध्ये शानदार फीचर्स कंपन्या उपलब्ध करून देत आहेत. अशातच आता एथरची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच झाली आहे.
कंपनीने लाँच केलेल्या Ather 450X या इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये 146 किमीची जबरदस्त रेंज देत आहे. जी केवळ 3.3 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग वाढवते. त्यामुळे Ather ची आगामी इलेक्ट्रिक स्कुटर ओलाला कडवी टक्कर देऊ शकते.
कशी असेल पॉवरट्रेन
नवीन इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल डिफॉल्ट राइड मोडसह येत असून त्याच्या टॉप-एंड प्रकारांमध्ये इको, राइड, स्पोर्ट्स आणि रॅप सारखे जबरदस्त मोड मिळत आहेत. परंतु, हे लक्षात घ्या की त्याची पॉवरट्रेन पूर्वीसारखीच असणार आहे. याला उच्च व्हेरियंट सारखाच 3.7kWh बॅटरी पॅक मिळत असून जो एका चार्जवर 146 किमीची जबरदस्त रेंज देत आहे.
यात बसवण्यात आलेली इलेक्ट्रिक मोटर 6.4kW ची कमाल पॉवर आणि 26Nm चा पीक टॉर्क जनरेट करत आहे. कंपनीची ही ई-स्कूटर 3.3 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग वाढवते तसेच तिचा सर्वात जास्त वेग 90 किमी प्रतितास इतका आहे.
6 तासांपेक्षा कमी वेळेत होणार चार्ज
कंपनीची Ather 450X चा नवीन बेस व्हेरिएंट स्लो चार्जरसह येत आहे. त्यामुळे बॅटरी पॅक पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 15 तास 20 मिनिटे लागतात, जरी Propack सह ते 5 तास 40 मिनिटांत चार्ज केले जाऊ शकतेकरण्यात येईल. या स्कूटरचा मागील टायर 100/80-12 असणार आहे. तसेच यात सिंगल-केस, अॅल्युमिनियम रिअर व्ह्यू मिरर आणि अॅल्युमिनियम साइडस्टेप मिळत आहे.
किती असणार किंमत?
या कंपनीकडून आपल्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत सुमारे 98,000 रुपये ठेवण्यात आली आहे. तर त्याचे टॉप मॉडेल खरेदी करण्यासाठी, तुम्हाला 1.28 लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत.