Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

ATM Transaction Failed Charges : ग्राहकांना मोठा धक्का! एटीएम ट्रान्झॅक्शन फेल झाले तर भरावे लागणार इतके शुल्क

सध्याच्या काळात बँक खाते आणि एटीएममधून पैसे काढणे अगदी सामान्य झाले आहे. यासाठी बँक विनामूल्य अनेक सेवा ऑफर देत आहेत.

ATM Transaction Failed Charges : सध्याच्या काळात अनेकजण एटीएममधून पैसे काढतात. एटीएममधून पैसे काढणे हे अतिशय सोपे झाले आहे. अनेक बँकांनी ATM व्यवहारांवर काही ठराविक शुल्क लागू केले आहे. परंतु, आता ग्राहकांना जास्त भुर्दंड बसणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कारण आता पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. कारण आता बँकेने एटीएम ट्रान्झॅक्शन अयशस्वी झाला तर त्यावर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. जर तुम्ही या बँकेचे ग्राहक असाल तर तुम्हालाही जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. काय आहे बँकेचा नवीन नियम जाणून घ्या.

जाणून घ्या मार्गदर्शक तत्त्वे ?

याबाबत पीएनबी बँकेकडून एक अधिसूचना जारी केले आहेत. यात ग्राहक शुल्काबाबत दोन महत्त्वाचे बदल जाहीर करण्यात आले आहेत.

1) डेबिट कार्ड आणि प्रीपेड कार्ड जारी शुल्क आणि वार्षिक देखभाल शुल्क यांचे पुनरावृत्ती.

2) खात्यातील अपुर्‍या शिलकीमुळे ते नाकारले गेले तर बँक डेबिट कार्डद्वारे करण्यात आलेल्या PoS आणि eComm व्यवहारांवर (देशांतर्गत/आंतरराष्ट्रीय) शुल्क आकारण्यास सुरुवात केली जाणार आहे.

सध्या बँक डेबिट कार्ड जारी करण्यासाठी तसेच देखभाल करण्यासाठी शुल्क आकारत आहे. ही बँक डेबिट कार्डच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये वेगवेगळे शुल्क आकारत आहेत.

मोजावे लागणार शुल्क?

पंजाब नॅशनल बँकेची मासिक मर्यादा पूर्ण झाल्यानंतर एटीएममधून पैसे काढण्यासाठी आपल्या ग्राहकांकडून 10 रुपये आकारण्यात येत आहे. प्रत्येक महिन्याला 5 विनामूल्य व्यवहार मिळत आहेत. मात्र हे लक्षात घ्या की हे शक्यतो केवळ यशस्वी एटीएम पैसे काढण्याच्या व्यवहारांची गणना करते. तुम्ही पीएनबी एटीएम वापरत असाल तेव्हा हे लागू होते.

समजा जर तुम्ही इतर बँकेचे एटीएम वापरत असाल तर, मेट्रोमध्ये प्रत्येक महिन्याला 3 व्यवहार आणि नॉन मेट्रोमध्ये महिन्याला 5 व्यवहार विनामूल्य आहेत. जर एकदा तुम्ही मर्यादा ओलांडली की, तुमच्याकडून प्रति व्यवहार 21 रुपये आणि लागू कर आकारले जाणार आहेत.