अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- संगमनेर तालुक्यातील पिंप्रीलौकी आजमपूर येथे धान्याचे पोते ढकलून दिल्यामुळे जाब विचारायला गेलेल्या महिलेला जातीवाचक शिवीगाळ व अपमान करून थेट फाशी देऊन मारण्याची धमकी दिल्यामुळे आश्वी पोलीस ठाण्यात २४ जणांविरुद्ध ॲट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फिर्यादींनी आश्वी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मोठ्याभाऊ गणपत लावरे याने सुमारे एक वर्षापूर्वी पत्र्याचे शेड बांधले होते.
दि. १४ मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास या शेडला मोठ्याभाऊ लावरे व त्याचे नातेवाईक असलेले भास्कर लावरे, गणेश लावरे, किरण लावरे, राजु लावरे, नामदेव लावरे, संपत लावरे, शंकर लावरे, भिमा लावरे, सोपान लावरे,
भागदत लावरे, प्रदिप लावरे, विठ्ठल लावरे, बबन लावरे, दिलीप लावरे, जालिंदर लावरे, मनोहर लावरे, साहेबराव लावरे, संपत लावरे, दामु लावरे, लहानु लावरे, पाराजी लावरे, भिमा लावरे, बाबुराव लावरे हे शेडला चारही बाजुने जाळी लावत होते.
यावेळी त्यांनी आमच्या घरासमोरील धान्याचे पोते ढकलून दिल्यामुळे धान्याची गोणी फुटली. त्यामुळे माझ्या पत्नीने त्यांना विचारणा केली असता या सर्वांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली व पत्नीला मोठ्याभाऊ लावरे, बबन लावरे व भागवत लावरे या तिघांनी ढकलून दिले.
त्यामुळे ती घरासमोरील लोखंडी पलंगावर पडली व तिच्या हातातील बांगड्या फुटल्या आहेत. यानंतर मोठ्याभाऊ लावरे, बबन लावरे, भागवत लावरे व नामदेव लावरे या चौघांनी माझ्या पत्नीला जातीवाचक बोलून तिचा अपमान केला व यांना फाशी देऊन मारू, असे म्हणत माझ्या सुनांना शिवीगाळ केली.
तसेच माझा मुलगा प्रदिप याची सायकलही ढकलुन दिली.आश्वी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ६७/२०२१ नुसार भा.दं.वि. कलम १४३, १४७, १४९, ३२३, ५०४, ५०६, ३४ व अनुसूचित जाती जमाती ३ (१) (आर) (एस) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.