अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:- जिल्ह्यात सध्या महिलांवर अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. केवळ सरपण तोडल्याच्या किरकोळ कारणावरून जावानेच आपल्या जावाच्या अंगावर डीजेल ओतून पेटवून दिल्याची गंभीर घटना संगमनेर तालुक्यात घडली होती.
आता परत त्याच तालुक्यात लग्नाचे अमिष दाखवून एका विवाहितेवर अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर असे की, संगमनेर तालुक्यातील एका २४ वर्षीय महिलेवर मालदाड येथील प्रविण गोरख नवले याने वेळोवेळी अत्याचार केला. लग्नाचे अमिष दाखवून महिलेच्या इच्छेविरुद्ध त्याने विविध ठिकाणी, वेळोवेळी अत्याचार केला.
नवले याचे वडील व भावजय यांनी देखील या महिलेस मारहाण, शिवीगाळ व दमदाटी केली. याबाबत महिलेने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
या फिर्यादीवरुन पोलिसांनी नवले, गोरख गंगा नवले, व एक महिला (सर्व रा. मालदाड, ता. संगमनेर) यांच्या विरुद्ध गुन्हा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माळी करत आहेत .