लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर गेले दोन महिने सुरु होता अत्याचार!

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- अकोले नाक्यावरील एका तरुणाने एकोणावीस वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवित गेल्या दोन महिन्यांपासून वेळोवेळी तिच्या मनाविरुद्ध तिच्यावर अत्याचार केला.

तरुणीने लग्नाची विचारणा केली असता संबंधित तरुणाने लग्नास नकार दिल्याने हताश झालेल्या तरुणीने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

हि धक्कादायक घटना संगमनेरात घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान विषारी औषध सेवन केलेल्या तरुणीला तिच्या कुटुंबियांनी वेळीच रुग्णालयात दाखल केल्याने ती वाचली.

याप्रकरणी पोलिसांनी अरबाज पठाण याच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, अकोले नाका परिसरातील कासारवाडी रस्त्यावर राहणार्‍या एका एकोणावीस वर्षीय तरुणीशी आरोपी अरबाज पठाण याची ओळख होती.

ओळखीचे रूपांतरप्रेमात झाले. अरबाजने गेल्या दोन महिन्यांपासून पीडितेसोबत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या दरम्यान तरुणीने लग्नासाठी त्याच्याकडे हट्ट केला असता आरोपीने ‘आपल्या कुटुंबातील लोक लग्नास तयार नाहीत’ असे सांगत लग्नाला स्पष्ट नकार दिला.

यामुळे हताश झालेल्या पीडितेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र कुटुंबियांच्या सतर्कतेमुळे तिचे प्राण वाचले. तरुणीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अकोले नाका परिसरात राहणार्‍या अरबाज पठाण याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला तत्काळ अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

Ahmednagarlive24 Office