अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- राहुरी तालूक्यातील मानोरी येथे घरासमोर उभे असलेल्या पती पत्नीवर आरोपी अशोक गुलाब आढाव याने कोणत्या तरी हत्याराने वार करून जखमी केले. ही घटना दिनांक १७ जून रोजी रात्री घडली आहे.
देवराम मिखाईल आढाव राहणार मानोरी ता. राहुरी. यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दिनांक १७ जून रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास देवराम आढाव व त्यांची पत्नी सुमन,
सुन दिपाली तसेच नात अक्षदा हे सर्वजण त्यांच्या राहत्या घरासमोर असताना तेथे अशोक गुलाब आढाव राहणार मानोरी ता. राहुरी. हा दारु पिवून त्या ठिकाणी आला व फिर्यादी देवराम आढाव व त्यांची पत्नी सुमन यांना शिवीगाळ करुन लाथा बूक्क्यांनी मारहाण करू लागला.
यावेळी त्याने कोणत्या तरी हत्याराने फिर्यादी देवराम आढाव यांच्या पोटावर व त्यांची पत्नी सुमन यांच्या कंबरेवर वार करून जखमी केले. आणि परत माझे नादी लागला तर तुमचा काटा काढीन. अशी दमदाटी करुन निघुन गेला आहे.
देवराम आढाव यांनी तात्काळ राहुरी पोलिसांत धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी अशोक गुलाब आढाव याच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रवींद्र डावखर हे करीत आहेत.