ताज्या बातम्या

Maharashtra News : पवारांच्या घरावर हल्ला, त्या कर्मचाऱ्यांसंबंधी परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2022 Maharashtra News :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी ज्या एसटी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांना एसटीच्या सेवेत पुन्हा घेणार नाही, अशी घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली.

दोन दिवसांपूर्वी पवार यांच्या मुंबईतील घरावर संपकरी एसटी कर्मचारी चाल करून गेले होते. त्यातील शंभराहून अधिक कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले असून ते अटकेत आहेत.

संपासंबंधी उच्च न्यायालयाने आदेश देताना सर्व कर्मचाऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना सेवेत घ्यावे, असे निर्देश दिले आहेत. मात्र, ही घटना न्यायालयाच्या निकालानंतर घडलेली आहे.

याचा अधार घेत परिवहन मंत्र्यांनी ही घोषणा केली आहे. एका बाजूला गुन्ह्याला समोरे जाताना दुसरीकडे नोकरीला कायमचे मुकण्याची वेळही या आंदोलक कर्मचाऱ्यांवर आली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office