व्यापाऱ्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यात ‘त्यांच्यावर’ हल्ला !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:-व्यापारी हिरेन यांच्या हत्याकांडामुळे नगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. यामुळे गेल्या काही दिवसांपासून श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर मध्ये दहशतीचे वातावरण पाहायला मिळाले होते.

हे प्रकरण अद्यापही ताजे असतानाच पुन्हा एकदा बेलापूर मध्ये एकावरहल्ला झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान व्यवसाय करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीवर एका ईसमाने चाकुसारख्या धारदार हत्याराने हल्ला केला आहे.

या घटनेने बेलापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या बाबत अधिक माहिती अशी की, बेलापुर येथे व्यवसाय करण्यासाठी बाहेरगावहून रामेश्वर पालीवाल हे बेलापुर येथे आले.

भाडोत्री खोली घेवुन त्याने आपला व्यवसाय सुरु केला असताना दोन दिवसापुर्वी बाहेरगावच्या एका व्यक्तीने पालीवाल यांना मारहाण केली. त्यांनतर दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच व्यक्तीने पालीवाल यांच्यावर धारदार हत्याराने हल्ला केला.

त्यात पालीवाल यांना दोन तीन ठिकाणी जखमा झालेल्या आहे. या हल्ल्यामुळे पालीवाल हे प्रचंड मानसिक तणावाखाली आहे. या हल्ल्यामागे नेमके कारण काय असावे या बाबत वेगवेगळी चर्चा चालू आहे.

दरम्यान जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली असून नागरिकांमध्ये पोलिसांचा धाकच उरलेला नसल्याचे चित्र पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24