अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:- शासनाकडून 2018 मध्ये वाळू उत्खनन आणि वाहतूकीचा शासकीय परवाना मिळवला. त्यासाठी त्यांनी शासनाकडे 8 लाख 72 हजार भरले होते. मात्र स्थानिकांच्या विरोधामुळे वाळू उपसा झाला नाही.
यामुळे शासनाला भरलेले पैसे परत मिळावे यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील झापडी गावातील एकाने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या बंगल्याच्या विशेष कार्यकारी अधिकारी दालनात अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला. मंगळवारीही घटना घडली.. मंत्री थोरात यांचा पेडर रोडवरील ‘रॉयल स्टोन’ हा बंगला आहे. या बंगल्याच्या विशेष कार्यकरी अधिकारी दालनात हा प्रकार घडला.
पांडुरंग वाघ असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.या प्रकरणी गावदेवी पोलिसांनी पांडुरंग वाघ यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच त्यांना अटक करुन जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.मात्र वाघ यांनी सनदशीर मार्गाचा अवलंब न करता शासनाला वेठिस धरण्याच्या हेतूने स्वत:ला पेटवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.