अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022, Ahmednagar Politics :- अहमदनगर शहरातली गुलमोहोर रोड व पाईपलाईन रोड भागातील जवळपास चार रस्त्यांची१०.३८ कोटि रुपयांची कामे मंजूर असुन त्यात काही कामांची वर्क ऑर्डर अजून नाही या कामात ठेकेदार मंजुर निविदे पेक्षा जास्त दरांची मागणी करत आहे. सदर रस्त्याचे काम थांबले आहे आज या भागातील नागरिक रस्त्याने जाताना त्यांना यांचा सामना करावा लागत आहे त्याची कुठली परवा संबंधित ठेकेदार व महापालिका अधिकाऱ्यांना राहिलेली नाही.
मुळात निवीदा प्रक्रिया या रस्त्यांच्या कामा संदर्भात राबविताना शासनाच्या नविन सुधारित दरपत्रकानुसार या कामांची अंदाजपत्रके तयार करण्यात आलेली आहे तरीसुद्धा संबंधित ठेकेदार वीस ते तीस टक्के जादा दराने सदर कामाच्या संदर्भात वाढीव दराची मागणी करत आहे.
ही मागणी नियमानुसार योग्य नसून जर ठेकेदार प्रमाणे दरात काम करण्यास तयार नसेल तर सदर निविदा रद्द करून पुन्हा या रस्त्यांच्या कामाकरिता निविदा प्रक्रिया राबवावी असा नियम आहे त्यामुळे संपूर्ण ठेकेदार व कंपनीला सर्वस्वी महानगरपालिका अधिकारी जबाबदार आहेत त्याचप्रमाणे त्यांना काही पदाधिकारी सुद्धा यात पाठीशी घालताना दिसून येत आहे हे प्रकारे या सर्वांच्या संगनमताने वाढीव दर मंजूर करून महापालिका तिजोरीवर दरोडा टाकण्याचा प्रकार या माध्यमातून दिसून येत आहे
वाढीव दराने जर कामाला मंजुरी मिळाली तर नगरपालिका येथे जवळपास दोन ते तीन कोटी रुपयांचे आर्थिक नुस्कान होणार आहे एकीकडे सर्वसामान्य माणूस आपले पैसे कर रूपाने महानगरपालिकेमध्ये प्रामाणिकपणे जमा करत असताना दुसरीकडे अशाप्रकारे दरोडे टाकण्याचे प्रकार काही अधिकारी व पदाधिकारी करत असतील तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना असे होऊ देणार नाही
तरी या संपूर्ण निवेदनाला जास्त व वाढीव दराने मंजुरी देण्यात येऊ नये अशी मागणी मनसेच्या नितीन भुतारे यांनी महानगरपालिका आयुक्त तसेच स्थायी समिती सभापती यांना निवेदनाद्वारे केली आहे. जर आपण या निविदा यांना वाढीव दराने मंजुरी दिली ठेकेदाराला जास्त पैसे देण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना महानगर पालिका आयुक्तांच्या दालनात आंदोलन करेल
यासंबंधी या भ्रष्टाचाराविरुद्ध न्यायालयात सुद्धा दाद मागण्यात येईल अशी असा इशारा मनसेच्या नितीन भुतारे यांनी दिला आहे. गुलमोहर रोड व पाईपलाईन रोड या कामाच्या ठेकेदारांची कामे ही सार्वजनिक बांधकाम विभाग ,महानगरपालिका तसेच जिल्हा परिषद याठिकाणी शासनाच्या नवीन दर पत्रकानुसार सुरू आहेत त्यामुळे याच कामा बाबत हे ठेकेदार जास्त दराची मागणी का करत आहेत असा सवाल मनसेच्या वतीने नितीन भुतारे यांनी उपस्थित केला आहे.
जर निविदा दरानुसार प्रमाणे काम करण्यास ठेकेदार तयार नसतील व वाढीव दरांची मागणी करत असतील तर सदर ठेकेदारांना आपण काळ्या यादीत टाकावे अशी मागणी मनसेच्या नितीन भुतारे यांनी केली आहे. सदर कामांचे दर हे निविदा छाननी प्रक्रियेत मंजूर झालेले आहेत तसेच स्थायी समितीत सुद्धा मंजूर झालेले असताना पुन्हा वाढीव दराची मागणी होत आहे त्यामुळे महानगर पालिकेवर ठेकेदार,अधिकारी तसेच पदाधिकारी दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत असे वाटते असे नितीन भुतारे यांनी सांगितले आहे.