अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील महांकाळवाडगाव येथील तरुणाने गावातील खासगी सावकराकडे जमीन गहाण ठेवून शेतीसाठी साडे १३ लाख रुपये व्याजाने घेतले होते.
सावकराच्या मुलाने या तरुणाला पोलिसाकडे तक्रार का करतो, अशी विचारणा करीत मारहाण करून मारण्याची धमकी दिली.
त्यामुळे वैतागलेल्या तरुणाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार काही नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यांनी तरुणाला कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
यासंदर्भात लक्ष्मण भागवत यांच्या फिर्यादीवरून शहर ठाण्यात सुरेश सवाई, सतीश सवई, योगेश सवई यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.