अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :- दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दोन विद्यार्थीनींनी विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न पारणेर तालुक्यातील पिंपळनेर येथे केला. मात्र या दोघीपैकी एकीला मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. तर दुसरीवर उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.
पिंपळनेर येथील विद्यालयात एक विद्यार्थीनी तर राळेगणसिद्धी येथील विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या दोघींनी नुकतीच दहावी परीक्षेत चांगल्या गुणाने यश संपादन केले होते. मात्र आज या दोघींनी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान विषारी औषध घेऊन आपली जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला.
त्यांना तातडीने शिरूर येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान एकीचा मृत्यू झाला तर दुसरीवर उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
या दोघींनी सोबत आत्महत्या करण्याचा निर्णय का घेतला? या मागील कारण अद्याप स्पष्ट नाही. छेडछाडीच्या कारणामुळे या दोघींची आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याचे कळते. मात्र या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून चिंता व्यक्त केली जात आहे.