अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- कोरोनामुळे देशभरातील सण उत्सवावर निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे. यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाच्या यावर्षी देखील सर्व सण उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरे करण्यात येत आहे. आता काही दिवसांवर सर्वांचे लाडके गणपती बाप्पाचा सण येऊन ठेपला आहे.
यामुळे यंदाच्या वर्षी देखील नियमांच्या बंधनात हा उत्सव साजरा करावा लागणार आहे. यंदाही गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरीही ऑक्टोबरमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. असं असताना आता गणेशोत्सवाकरता गावी जाणाऱ्या चाकरमान्यांकरता कोरोना चाचणी म्हणजे आरटीपीसीआर चाचणी महत्वाची असणार आहे.
दरवर्षी गणेशोत्सवाकरता कोकणात जाणार मोठा चाकरमानीवर्ग आहे. अगदी जून, जुलैपासूनच चाकरमान्यांची लगबग सुरू होते. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी 1700 एसटी गाडयांचं आरक्षण ठेवण्यात आलं आहे. तसेच परतीच्या आरक्षणालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मात्र चाकरमान्यांकरता कोरोना टेस्ट बंधनकारक असल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांकरता मोठं ऑनलाईन बुकींग करण्यात आलं आहे. 1700हून अधिक गाड्यांचं आरक्षण आतापर्यंत झालं आहे.
कोकणात प्रवेश करताना चाकरमान्यांची कोरोना चाचणी होणार यामुळे चाकरमान्यांकडून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. मुंबईतल्या चाकरमान्यांची कोकणच्या वेशीवर कोरोना चाचणी केली जाणार आहे.
तसंच प्रवासावेळी दोन लसीचे डोस घेतल्याचं सर्टीफिकेट आणि ७२ तासांचा आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल बंधनकारक करण्यात आलाय . त्यामुळे चाकरमानी मात्र नाराज आहेत.