ऑडी इंडियाकडून दिग्गज ऑडी क्यू ७ साठी बुकिंग्जचा शुभारंभ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :-  ऑडी या जर्मन लग्झरी कार उत्पादक कंपनीने आज भारतामध्ये त्यांची नेक्स्ट-जनरेशन ऑडी क्यू७ च्या बुकिंग्जच्या शुभारंभाची घोषणा केली. नवीन ऑडी क्यू७ मध्ये कार्यक्षमता, स्टाइल, आरामदायीपणा व ड्रायव्हिंग क्षमतेचे परिपूर्ण संयोजन आहे.

नवीन शक्तिशाली ३.० लिटर व्ही६ टीएफएसआय पेट्रोल इंजिन, जे निर्माण करते ३४० एचपी शक्ती, ५०० एनएम टॉर्क आणि फक्त ५.९ सेकंदांमध्ये प्रतितास ० ते १०० किमी गती प्राप्त करते. ऑडी क्यू७ ५००,००० रूपये इतक्या सुरूवातीच्या बुकिंग रक्कमेमध्ये बुक करता येऊ शकते.

ऑडी इंडियाचे प्रमुख श्री. बलबीर सिंग धिल्लों म्हणाले, “२०२१ मध्ये नऊ उत्पादने लॉंच केल्यानंतर आम्ही आणखी एक अविश्वसनीय ऑफरिंग – दिग्गज ऑडी क्यू७ सह नववर्षात प्रवेश करण्यास उत्सुक आहोत. आम्ही आजपासून या कारच्या बुकिंग्जचा शुभारंभ करत आहोत.

ऑडी क्यू७ रस्त्यावरील दिमाखदार उपस्थिती आणि ऑन-रोड व ऑफ-रोड वैविध्यपूर्ण कार्यक्षमतेमुळे ग्राहकांमध्ये लोकप्रि‍य ठरली आहे.

ऑडी क्यू७ च्या माध्यमातून आम्ही नवीन डिझाइन व वैशिष्ट्यांसह या स्तराला अधिक उंचावर नेत आहोत. मला विश्वास आहे की, ऑडी क्यू७ ऑडी समूहामध्ये सामील होण्याची इच्‍छा असलेल्या विद्यमान व भावी ग्राहकांमध्ये लोकप्रि‍य राहिल.”

ऑडी क्यू७ मध्ये सर्वोत्तम वैशिष्ट्ये आहेत- जसे अॅडप्टिव्‍ह एअर सस्पेंशन, ऑडी ड्राइव्ह सिलेक्ट, क्वॉट्रो ऑल-व्हिल ड्राइव्ह, जे उच्च दर्जाची ड्रायव्हिंग क्षमता व हाताळणीमध्ये साह्य करते.

ड्रायव्हरला साह्य करणारी वैशिष्ट्ये आहेत- पार्क असिस्ट प्लससह ३६०-डिग्री-व्ह्यू कॅमेरा आणि लेन डिपार्चर वॉर्निंग. मॅट्रिक्स एलईडी हेडलॅम्प्स व रिअर एलईडी टेल लॅम्प्सच्या माध्यमातून अपवादात्मक लायटिंग परफॉर्मन्सची खात्री मिळते. तसेच पुढील व मागील बाजूस डायनॅमिक टर्न इंडिकेटर्स आहेत.

आरामदायी वैशिष्ट्यांमध्ये ४-झोन एअर कंडिशनिंग, एअर आयनोझर व अरोमाटायझेशन, कॉन्टर अॅम्बियण्ट लायटिंगसह ३० रंग, बीअॅण्डओ प्रि‍मिअम ३डी साऊंड सिस्टिम यांचा समावेश असण्यासह इतर सर्वोत्तम वैशिष्ट्ये देखील आहेत. नवीन ऑडी क्यू७ प्रि‍मिअम प्लस व टेक्नोलॉजी या दोन व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध असेल.

ग्राहक त्यांच्या घरांमधून आरामशीरपणे ऑनलाइन (www.audi.in) ऑडी क्यू७ बुक करू शकतात किंवा जवळच्या ऑडी इंडिया डिलरशिपमध्ये त्यांची रूची नोंदवू शकतात. ऑडी इंडियाने २०२१ साठी विक्रीमध्ये १०१ टक्‍के वाढीची घोषणा केली. ब्रॅण्‍डने ३,२९३ रिटेल युनिट्सच्या उत्तम विक्रीची नोंद केली.

या वाढीला ऑडी ई-ट्रॉन ५०, ऑडी ई-ट्रॉन ५५, ऑडी ई-ट्रॉन स्पोर्टबॅक ५५, ऑडी ई-ट्रॉन जीटी, ऑडी आरएस ई-ट्रॉन जीटी या पाच इलेक्ट्रिक कार्स आणि पेट्रोल सक्षम क्यू–रेंजसह ए-सेदान्सकडून चालना मिळाली. २०२१ मध्ये ई-ट्रॉन ब्रॅण्डअंतर्गत पाच मॉडेल्‍ससह नऊ नवीन मॉडेल्स लॉंच करण्यात आली.