file photo

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :- नेवासे पंचायत समितीमध्ये बचत गटाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार उघड करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी शुक्रवारी पंचायत समितीत जाऊन बचत गटाच्या समन्वयकांना जाब विचारला. गेले दोन दिवस बचत गटाची लाभार्थी आणि पंचायत समिती अधिकारी यांची प्रत्येकी एक हजार रुपये मागितल्या प्रमाणे द्यावे, अशा अर्थाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली.

या पार्श्वभूमीवर भाजप ा कार्यकर्त्यांनी पंचायत समितीमध्ये या प्रकरणाच्या चौकशीसाठी निवेदन दिले असता त्या ठिकाणी मोठा गदारोळ झाला व जिल्हा समन्वयक यांच्याशी खडाजंगी झाली. कांगोनी येथील भरत शिंदे यांची आणि साळुंके नामक अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा झाली आणि त्यात त्या अधिकाऱ्याने ४० हजार रुपये कर्ज घेण्यासाठी एक हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली.

प्रत्येक सदस्यसाकडून १००० रुपये जमा केले तर संपूर्ण नेवासे तालुक्यामध्ये जवळपास बचत गटाचे १२००० महिला सदस्य आहे. त्यामुळे ही दिसणारी किरकोळ एक हजार रुपयाची रक्कम म्हणजे मोठा भ्रष्टचार आहे. हा गफला कोणा पर्यंत जातो हा प्रश्न जनतेसमोर पडलेला आहे. भाजपच्या वतीने गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आणि कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक दृष्ट्या दुर्लभ असणाऱ्या आत्मनिर्भर भारत अंतर्गत बचत गटांना प्रोत्साहन मिळावे व ग्रामीण भागामध्ये छोटे छोटे उद्योग व्यवसाय सुरु व्हावे यासाठी ४० हजार रुपये तीन टक्के व्याज दराने बचत गटातील प्रत्येक सदस्यांना देण्यात येत आहे.

परंतु भ्रष्ट अधिकारी गोरगरीबांकडून एक हजार रुपयाची मागणी करून पिळवणूक करत आहेत. ज्यांनी एक हजार रुपये दिले. त्यांची प्रकरणे लगेच होतात. आणि ज्यांनी पैसे दिले नाही त्यांना ग्रुप मधून डिलीट करण्यात येते, असा कारभार नेवासे पंचायत समितीमधील अधिकारी करत आहे.

या सर्व प्रकरणात सभापतीही सहभागी आहेत, असे समोर येत आहे याला जाब विचारण्यासाठी आज भाजपने बचत गट समन्वयक यांना धारेवर धरले आणि कारवाई करण्याची मागणी केली.