अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :- अवनी ह्या मासिक पाळीच्या सर्वांगीण देखभालीशी संबंधित स्टार्टअपने मासिक पाळी स्वच्छतेशी संबंधित अनेक वनौषधींवरील उत्पादनांचा शुभारंभ केला आहे व त्यामध्ये बायो- एंझायम पाळीमध्ये वापरण्याचे लिक्विड क्लीनर, मासिक पाळीचे कप वॉश आणि अँटीबॅक्टेरियल अंतर्गत वाईप्स (पट्ट्या) ह्यांचा समावेश आहे.
मासिक पाळीच्या काळामध्ये कापडावर आधारित सॅनिटरी पॅडसच्या वापराशी संबंधित गैरसमज तोडण्यासाठी हा ब्रँड कार्यरत आहे. अवनीच्या संस्थापिका सौ. सुजाता पवार यांनी सांगितले की, “अलीकडच्या काळामध्ये आर्थिक कंपन्यांनी कापडावर आधारित पॅडस आणि स्वच्छता उत्पादनांच्या वापराविषयी शंका निर्माण केलेल्या आहेत. परंतु कापडावर आधारित पॅडस अस्वच्छ किंवा हानिकारक असतात, हा केवळ एक गैरसमज आहे.
त्याउलट, स्वच्छ व कापडावर आधारित पॅडस हे रसायनांपासून मुक्त, त्वचेला अनुकूल असतात आणि त्यामुळे महिला किंवा पर्यावरणासाठी कोणतीही हानी होत नाही. आम्ही जागरूकता निर्माण करून महिलांसाठी अधिक व्यवहार्य सोल्युशन देण्याचा प्रयत्न करत आहोत. ह्या नवीन उत्पादनांच्या शुभारंभासह, आम्हांला आशा आहे की, कापडाच्या उत्पादनांचा वापर वाढेल आणि अवनी महिलांसाठी प्रवासातील साथीदार बनेल.”
पाळीतील वापरण्याचा अवनी वॉश नव्याने सुरू झालेले हे क्लीनर भारतातील पहिले 100% वनौषधींवर आधारित लिक्विड वॉश आहे ज्याची रचना पाळीमधील रक्ताचे डाग आणि शरीरातील द्रवांचा वास ह्यापासून प्रभावी संरक्षण देण्यासाठी विशेष प्रकारे केली गेलेली आहे. त्यामध्ये वनौषधींवर आधारित सर्फ्राक्टंटसचे, बायो एंझायम आणि ग्रीन टी ह्यांचे मिश्रण आहे ज्यामुळे आपल्या पाळीमध्ये महत्त्वपूर्ण असलेल्या पँटीज, कापडी पॅडस आणि पँटी लायनर्स ह्यांचे संरक्षण होते.
मासिक पाळीसाठीचा अवनी कप वॉश 100% वनौषधीवर आधारित हा लिक्विड वॉश मासिक पाळीसाठीच्या कप्सच्या सफाईसाठी व ते धुण्यासाठी वापरता येतो. हा वॉश रंग नसलेला आहे आणि सिलिकॉन आधारित कपसाठी सुरक्षित आहे. पाळीतील वापरण्याचा अवनी वॉश आणि अवनी मासिक पाळी कप वॉश हे रू. २४९ दराने १०० मिलीच्या पॅकमध्ये उपलब्ध असतील आणि ते ब्रँडची वेबसाईटवर आणि इ- कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध असतील.
महिलांसाठी अँटीबॅक्टेरियल अंतर्गत वाईप्स हे उत्पादन नैसर्गिक जैव विघटनशील फायबर्सने आणि कोणतेही अल्कोहोल न वापरता बनवलेले आहे. हे वाईप्स स्त्रीरोगतज्ञांनी प्रमाणित केलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये ३.५ पीएच इतके संतुलन आहे व त्यासल आलो वेरा, विटामीन ई आणि चहाचे एक्स्ट्रॅक्टस हे घटक आहेत.
हे वाईप्स रॅशेस, एलर्जी आणि संक्रमणांपासून संरक्षण देतात. पाळीमध्ये, लैंगिक क्रियेच्या आधी/ नंतर आणि युरीन नंतर वापरण्यासाठी सर्वोत्तम साथीदार आहेत. ८ वाईप्सचा प्रवासाला सुलभ बनवणारा ८ वाईप्सचा पॅक रू. ५९ ला ब्रँडच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.