अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- नगर – शहराच्या विकासात महानगरपालिकेची महत्वाची भुमिका आहे. दैनंदिन गरजांबरोबरच शहरात विकास कामे झाली पाहिजे, यासाठी लोकप्रतिनिधींनीचा पुढाकार आवश्यक आहे.
अविनाश घुले यांनी आपल्या कामांनी वेगळा ठसा उमटविला आहे. विविध क्षेत्रातील मित्र परिवार आणि नागरिकांच्या संपर्कामुळे अनेकांची कामे करण्यास ते नेहमीच तत्पर असतात.
आता मनपाच्या स्थायी समितीच्या सभापतीपदाच्या माध्यमातून शहराच्या विकासाला चालना देतील, असा विश्वास केडगांव येथील किसन दूध उत्पादक संघाचे चेअरमन मच्छिंद्र हुलगे यांनी केले.
महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी अविनाश घुले यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा मित्र परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मच्छिंद्र हुलगे बोलत होते. कार्यक्रमास सोनु घेंबुटे, महेश सरोदे, संभाजी जाधव, नवनाथ घेंबुड, निलेश राऊत, गोरख हुलगे, राम सरोदे, बिटू शिंदे, अतुल ठोंबरे, अतुल कोतकर, महेश सरोदे, अमोल ठाणगे,
ओंकार कापरे, विष्णूपंत म्हस्के, राहुल वराट, ऋषीकेश गवळी, अनिकेत कोतकर आदि उपस्थित होते. सत्काराबद्दल अविनाश घुले यांनी आभार मानले. मित्र परिवाराच्या सहकार्याने आपणास चांगले काम करण्याची प्रेरणा मिळत असून,
त्या माध्यमातून विविध पदही मिळत आहे. पदाचा उपयोग सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी करु, असे सांगितले. याप्रसंगी महेश सरोदे, संभाजी जाधव आदिंनी मनोगत व्यक्त केले, निलेश राऊत यांनी आभार मानले.