कारभारास वैतागून ‘ या’ ग्रामपंचायतीला ठोकले टाळे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- वेळोवेळी बंद असलेले ग्रामपंचायत कार्यालय, ग्रामविकास अधिकारी व कर्मचारांची अनुपस्थिती, दाखले मिळण्यासाठी मारावे लागणारे हेलपाटे व होणारा विलंब यामुळे राहुरी तालुका सात्रळ येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप लावले.

अनेक महिला व ग्रामस्थ दाखले व इतर कागदपत्रे घेण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात आले होते. परंतु कार्यालय बंद असल्याने कर्मचाऱ्यांची वाट पाहत असल्याचे आढळले. एक महिला तर पतीच्या मृत्यू दाखला मिळण्यासाठी गेली तीन महिन्यापासून हेलपाटे मारत असल्याचे दिसून आले.

ग्रामस्थच्या तक्रारीत ग्रामपंचायत कर्मचारी वर्गावर रोष होता. ग्रामपंचायत मध्ये कामानिमित्त आलेल्या ग्रामस्थांना कधीही वेळेवर मिळत नसलेले दाखले, उतारे, महत्वाची नोंदी, कधी ग्रामविकास अधिकारी नाही तर कधी संबांधित कर्मचारी जागेवर हजर नाही व त्यामुळे होणारा मनस्ताप,

माहिती च्या अधिकारात विचारलेल्या अर्जाचे मुदतीत न दिलेले उत्तरे, कर्मचारांची मनमानी या सगळ्याला वैतागून ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयास ठाळे लावून निषेध व्यक्त केला आहे.

याच वेळी मिळालेल्या माहितीनुसार ग्रामपंचायतचे दप्तर गेली आठ दिवसापासून ऑफिस बाहेर गेलेले असून त्या बद्दल ची माहिती कर्मचार्यानी सरपंचासही दीलेली नसल्याचे आढळून आलेले आहे. या प्रसंगी बिपीन ताठे, प्रमोद डुकरे, योगेश इल्हे, संजय निधाने, संदीप नालकर, असीर पिंजारी, अण्णासाहेब ब्राह्मणे व अनेक युवक, ग्रामस्थ उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24