Safe Driving Tips : गाडी चालवत असताना टाळा ‘या’ चुका, नाहीतर मोठ्या अडचणीत याल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Safe Driving Tips : आपल्या देशात वाहतुकीचे नियम खूप कडक केले आहेत. अपघात टाळण्यासाठी नियम मोडल्यावर भराव्या लागणाऱ्या दंडाच्या रकमेत पूर्वीपेक्षा खूप वाढ केली आहे.

तरीही अपघाताचे सत्र सुरु आहे. अनेकदा हे अपघात वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर होतात. जर तुम्हीही गाडी चालवत असताना काही चुका करत असाल तर त्या आजच टाळा नाहीतर संकटात याल.

मोबाईल वापरणे

अनेकांना गाडी चालवताना मोबाईलवर बोलत असतात किंवा मेसेज चेक करतात. परंतु, त्यांना रस्त्यावर इतर लोक असल्याचा विसर पडतो. त्यामुळे अशावेळी गाडी चालवताना मोबाईल वापरला तर ते स्वतः सोबत इतरांचा जीव धोक्यात घालतात.

हेडफोन वापरणे

कारमध्ये आणि बाईक चालवताना मोबाईल फोन, हेडफोन घालणे अगदी सामान्य आहे. बाईक चालवताना अनेकांना फोन आल्यावर कळत नाही त्याचबरोबर काही जणांना बाईक चालवताना बोलणे किंवा गाणी ऐकणे आवडते.

त्यामुळे ते हेडफोन वापरतात. हेडफोन वापरणे चुकीचे नाही पण तुम्ही गाडी चालवत असाल तर कधीही हेडफोन वापरू नका. नाहीतर अपघात होऊ शकतो.

मोठ्या आवाजात गाणे ऐकणे

अनेकांना गाडी चालवताना संगीत ऐकायला आवडते. काहीजण तर आफ्टरमार्केट स्पीकर, सब-वूफर, अॅम्प्लिफायर्स आणि बास ट्यूब्स वापरून मोठ्या आवाजात गाणी ऐकतात. त्यामुळे इतरांची गैरसोय होते, त्याचबरोबर कारचालकांना इतर वाहनांच्या हॉर्नचा आवाज ऐकू येत नाही.

नियमांचे होते उल्लंघन

जर तुम्ही यापैकी एकही गोष्ट केली तरीही वाहतूक नियमांचे उल्लंघन होते. त्यामुळे तुमच्यावर कारवाई होऊ शकते. त्यासोबतच इतरांचाही आणि स्वतःचा जीव धोक्यात येतो.