ताज्या बातम्या

Whatsapp : भन्नाट फीचर! आता चुकून डिलीट केलेले मेसेज मिळणार परत, पण…

Published by
Ahmednagarlive24 Office

Whatsapp : अनेकदा आपण Whatsapp वापरत असताना एखादा मेसेज चुकून डिलीट करतो. काहीवेळा हा मेसेज महत्त्वाचा असतो,परंतु रो परत मिळवता येत नाही. वापरकर्त्यांचा विचार करून आता Whatsapp ने एक भन्नाट फीचर आणले आहे.

यामुळे वापरकर्त्यांना चुकून डिलीट केलेले मेसेज परत मिळणार आहे. परंतु, मेसेज परत मिळवण्यासाठी तुमच्याकडे फक्त 5 सेकंदांचा वेळ असणार आहे.यावेळेतच तुम्हाला मेसेज परत मिळेल.

या फीचरचा सर्वात मोठा फायदा हा की अनेकदा आपण ग्रुपमधून गडबडीत मेसेज डिलीट करताना डिलीट फॉर एव्हरीवन ऐवजी डिलीट फॉर मी पर्यायावर निवडतो. त्यानंतर चॅटमधून तो मेसेज काढून टाकला जातो.

परंतु,ग्रुपमधील इतर सदस्यांना तो मेसेज दिसतो. आता या नवीन फीचरच्या मदतीने तुम्ही डिलीट फॉर मी ऑप्शनवर टॅप केल्यानंतरही मेसेज पूर्ववत करता येणार आहेत.

नवीन फीचर असे करेल काम

हे फीचर iOS आणि Android दोन्हीसाठी आहे. याबाबत ट्विटरवर कंपनीने माहिती दिली आहे. लक्षात घ्या की हा डिलीट फॉर मी ऑप्शन फक्त 5 सेकंदांसाठी असणार आहे. म्हणजेच 5 सेकंदांमध्ये तुम्हाला मेसेज पुन्हा मिळवता येईल.

पाच वर्षांपूर्वी आले होते फीचर

2017 मध्ये WhatsApp ने हे फीचर जारी केले होते. सुरुवातीला हे फीचर केवळ पहिल्या 7 मिनिटांसाठी वापरले जात होते. त्यानंतर ही वेळ वाढवून ती सुमारे 60 तास इतकी केली होती.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: WhatsApp