OnePlus 11R 5G : वनप्लसच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण कंपनी लवकरच OnePlus 11R 5G लाँच करणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा फोन OnePlus 11 5G पेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. त्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होईल.
तुम्ही जर हा फोन विकत घेतला तर तर तुम्हाला कमी किमतीत जबरदस्त फीचर्स मिळतील. कंपनीचा हा 5G स्मार्टफोन असणार आहे. येत्या 7 फेब्रुवारी रोजी कंपनी आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच करणार आहे. यात काय फीचर्स मिळतील ते पाहुयात.
7 फेब्रुवारी रोजी OnePlus क्लाउड इव्हेंटमध्ये OnePlus 11 5G आणि OnePlus 11R 5G शिवाय, OnePlus Buds Pro 2 TWS इयरफोन आणि नवीन OnePlus TV मॉडेल लॉन्च केले जाण्याची शक्यता आहे. यापूर्वीच कंपनीने चीनमध्ये OnePlus 11 5G लॉन्च केला आहे परंतु OnePlus 11R 5G चे स्पेसिफिकेशन्स अजून समोर आले नाहीत.
किंमत कमी होणार
OnePlus 11 5G भारतीय बाजारपेठेत OnePlus चे फ्लॅगशिप डिव्हाइस म्हणून लॉन्च केले जाणार असून फीचर्सच्या बाबतीत दुसरा डिव्हाइस कमी शक्तिशाली असेल. जर असे असेल तर OnePlus 11R 5G ची किंमत फ्लॅगशिप मॉडेलपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. यात मजबूत कॅमेरा आणि वापरकर्त्यांना फ्लॅगशिप डिव्हाइसपेक्षा कमी किमतीत दुसरा पर्याय मिळेल.
या फोनची 8GB RAM आणि 128GB स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिएंटसाठी 35,000 ते 40,000 रुपयांच्या दरम्यान किंमत असण्याची शक्यता काही अहवालांनी केली आहे. तर त्याच वेळी, या फोनचे हाय-एंड 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज वेरिएंट 45,000 रुपयांच्या जवळपास खरेदी केले जाण्याची शक्यता आहे. हा फोन चीनमध्ये OnePlus Ace 2 नावाने लॉन्च केला जाण्याचेही संकेत मिळत आहेत.
असे असतील स्पेसिफिकेशन
हा फोन 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा फुल HD + AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह फोन 16GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज मिळेल. हा Android 13 वर आधारित OxygenOS सॉफ्टवेअर उपलब्ध होणार आहे असे स्पष्ट झाले आहे.
जर कॅमेरा फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास या फोनच्या मागील पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सिस्टीममध्ये 50MP मुख्य सेन्सर दिला जाणार आहे. तर कॅमेरा मॉड्यूलला 8MP अल्ट्रा-वाइड आणि 2MP मॅक्रो लेन्स मिळू शकतील. यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. तसेच 5000mAh बॅटरी 100W पर्यंत जलद चार्जिंग सपोर्ट मिळेल.