Recharge plans : जबरदस्त प्लॅन! ‘या’ कंपन्यांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज 3 जीबी डेटासह मिळतात अनेक फायदे

Recharge plans : सर्व टेलिकॉम कंपन्या म्हणजेच जिओ, एअरटेल, BSNL आणि वोडाफोन आयडिया आपल्या ग्राहकांसाठी अनेक नवनवीन प्लॅन्स आणत असतात.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या सर्वच कंपन्यांकडे वेगवेगळ्या बेनिफिट्स आणि किंमतीसह येणारे जबरदस्त प्लॅन्स उपलब्ध आहेत. या प्लॅनमध्ये ग्राहकांना रोज 3GB डेटासह प्लॅन्स, अमर्यादित कॉलिंगसह इतर अनेक फायदे मिळतात.

Advertisement

एअरटेल

एअरटेल या कंपनीचा एकच प्लॅन आहे यामध्ये दररोज 3 जीबी डेटा मिळत असून या प्लॅनची ​​किंमत 699 रुपये इतकी आहे. या प्लॅनची वैधता 56 दिवस आहे. ग्राहकांना यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस सुविधा मिळते. त्याशिवाय Amazon Prime Mobile चे सदस्यत्वही कंपनीकडून मिळते.

तसेच Airtel Extreme मोबाइल सदस्यता मिळत असून यासह SonyLIV जोडता येते. हे लक्षात घ्या की हे ओटीटी प्लॅटफॉर्म तुम्हाला कंपनीच्या अॅपच्या मदतीने पाहता येईल. या प्लॅनमध्ये तुम्हाला विंक म्युझिक अॅपवर मोफत गाणी ऐकण्याची आणि मोफत हॅलो ट्यून्सचा फायदा मिळतो. त्याचबरोबर प्लॅनसह Fastag वर 100 रुपयांचा कॅशबॅक दिला जातो.

Advertisement

जिओ

कंपनीचे एक नाही तर दोन रिचार्ज प्लॅन आहेत यामध्ये ग्राहकांना दररोज 3 जीबी डेटा मिळतो. एक म्हणजे 1,199 रुपयांचा प्लॅन आणि दुसरा म्हणजे 419 रुपयांचा प्लॅन. 1,199 रुपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 84 दिवसांची वैधता मिळते. तर दररोज 3GB डेटासह अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतात.

Advertisement

त्याचबरोबर 419 रुपयांच्या या रिचार्ज प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. तर यामध्ये ग्राहकांना दररोज 3GB डेटा, सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतात.

कंपनीच्या आणखी एका प्लॅनची किंमत 4,119 रुपये असून यामध्ये तुम्हाला 365 दिवसांसाठी दररोज 3 जीबी डेटासह 100 रुपये मिळतील. तसेच Jio Cinema, Jio TV, Jio Security आणि Jio Cloud चे मोफत सबस्क्रिप्शन मिळते.

Advertisement

Vodafone-Idea

Vodafone-Idea च्या या प्लॅनची किंमत 475 रुपये असून वैधता 28 दिवसांची आहे. दररोज 3 GB डेटा तसेच अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतात. तर कंपनीचा दुसरा प्लॅन 699 रुपयांचा असून सर्व सुविधा अगोदरच्या प्लॅनप्रमाणे असून या प्लानची वैधता 56 दिवसांची आहे.

तसेच कंपनीच्या 601 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 3 GB डेटा मिळतो. अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतात. या प्लॅनची ​​वैधता 28 दिवसांची आहे. विशेष म्हणजे या प्लॅनमध्ये 16 GB अतिरिक्त डेटा उपलब्ध आहे.Disney Plus Hotstar सबस्क्रिप्शन या प्लॅनमध्ये मिळते.

Advertisement

BSNL

BSNL च्या 299 रुपयांच्या प्लॅनची वैधता 30 दिवसांची आहे. तर यामध्ये दररोज 3 GB डेटा,अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतात. जर तुम्ही दररोज 3 जीबी डेटासह दीर्घ वैधता योजना शोधत असाल, तर तुम्ही कंपनीच्या 2,999 रुपयांच्या प्लॅन घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला 365 दिवसांची वैधता आणि दररोज 3GB डेटा आणि सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगसह दररोज 100 एसएमएसचा लाभ घेता येईल.

Advertisement