Sukanya Samriddhi Yojana : जबरदस्त योजना! फक्त 250 रुपये गुंतवून नवीन वर्षात तुमच्या मुलीला बनवा करोडपती

Sukanya Samriddhi Yojana : सध्या पोस्ट ऑफिस किंवा बॅँकेद्वारे अनेक योजना राबवल्या जात आहेत. अनेकजण आपले पैसे सुरक्षित आणि चांगला परतावा मिळण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या योजनेत गुंतवणूक करतात.

कारण पोस्ट ऑफिसच्या योजनेत कोणतीही जोखीम आणि जबरदस्त परतावा मिळतो. यापॆकीच एक योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना होय. या योजनेत चांगला परतावा मिळत असून तुम्ही या योजनेत 250 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

हे लक्षात घ्या की ही दीर्घकालीन योजना आहे. या योजनेत तुम्हाला खूप जास्त पैसे गुंतवण्याची गरज नाही. तुमची मुलगी 21 वर्षांची झाल्यावर तुम्हाला किती पैसे हवे आहेत ते ठरवून त्यानुसार तुम्हाला पैसे गुंतवावे लागतात.

वर्षाला गुंतवू शकता 1.50 लाख रुपये

मुलींचे भविष्य सुधारण्यासाठी सरकारने ही योजना सुरु केली आहे. या योजनेत 10 वर्षांपर्यंतच्या मुलीचे खाते उघडता येते. यामध्ये तुम्ही कमीत कमी 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये जमा करू शकता. मुलगी २१ वर्षांची झाल्यानंतर ही योजना परिपक्व होते.

मुलगी 18 वर्षांची होईपर्यंत तुमची गुंतवणूक लॉक इन केली जाते. तसेच 18 वर्षानंतरही एकूण पैशापैकी 50% पैसे काढता येतात. ज्याचा उपयोग तिच्या शिक्षणासाठी करता येतात. तुमची मुलगी 21 वर्षांची झाल्यावर सर्व पैसे काढता येतात.

कर सवलत मिळते

या योजनेत आयकर कायदा 80C अंतर्गत कर सवलत मिळते. तुम्ही प्रत्येक वर्षी 1.50 लाख रुपये गुंतवून कर सवलत मिळवू शकता. या योजनेत तुम्हाला मिळणारा परतावा करमुक्त असतो. सध्या या योजनेत ७.६ टक्के व्याज मिळत आहे.

अकाउंट कोठे सुरु करायचे

कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत अकाउंट उघडता येते. योजनेअंतर्गत, मुलीच्या जन्माच्या 10 वर्षांच्या आत तुम्ही कमीत कमी 250 रुपये जमा करून हे खाते उघडू शकता.