अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2022 :- नगर तालुक्यातील निमगाव वाघा व नेप्ती परिसरातील तीन गावठी दारू अड्ड्यांवर नगर तालुका पोलिसांच्या पथकाने छापे टाकत सुमारे १ लाख ७४ हजार रुपये किमतीचे २ हजार ९७० लिटर गावठी हातभट्टी दारू बनविण्यासाठीचे रसायन जप्त करून ते नष्ट केले.
तर हे गावठी दारू अड्डे चालविणाऱ्या ३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या धडक कारवाईमुळे गावठी हातभट्टी दारू तयार करणारांचे धाबे दणाणले आहेत.
नगर तालुका पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. नगर तालुका पोलिसांच्या पथकाने नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे घराचे आडोशाला सुरु असलेल्या गावठी हातभट्टीवर छापा टाकून ४८ हजार रुपयांचे ८०० लिटर दारु तयार करण्याचे कच्चे रसायन पकडले.
या प्रकरणी मनोहर टिल्लु पवार (रा पवारवस्ती, निमगाव वाघा ता.नगर ) याच्यावर नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
निमगाव वाघा शिवारात दुसऱ्या एका ठिकाणी घराच्या शेजारी असलेल्या गावठी हातभट्टीवर छापा टाकत ५४ हजार किमतीचे ९७० लिटर दारु तयार करण्याचे कच्चे रसायन जप्त करून कुमार दादाभाऊ फलके (रा निमगाव वाघा ता.नगर ) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
नेप्ती शिवारातील चौगुलेवस्ती येथे घराच्या आडोशाला ७२ हजार किमतीचे १२०० लिटर गावठी हातभट्टीची दारु तयार करण्याचे कच्चे रसायन पकडले.