बाप रे, नगर जिल्ह्यातील 18 हजार मुलांना कोरोना…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :-  नगर जिल्ह्यात बाधितांमध्ये व लहान मुलांचे प्रमाण वाढत आहे. मागील तीन महिन्यांत १८ हजार बालकांना कोरोना झाला, तर मे महिन्यात ०ते १८ वयोगटातील बाधित मुलांची संख्या ९ हजार ९२८ इतकी आढळली.

राष्ट्रीय पातळीवरील सल्लागारांनी तिसऱ्या लाटेत बालकांना मोठय़ा प्रमाणावर संसर्ग होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे सरकारने राज्यस्तरीय बालरोगतज्ञांचा कृती गट स्थापन केला आहे.

त्याचबरोबर बालकांवरील उपचारांच्या दृष्टीने रुग्णालयस्तरावर पायाभूत सुविधा, यंत्रणा उभारण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी सुरू असल्याचे आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

लहान मुलांमध्ये आजाराचे प्रमाण कमी असून पालकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी केले आहे.

दरम्यान, नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी हे प्रमाण चिंताजनक असल्याचे सांगितले. मात्र बालरोगतज्ज्ञांच्या माहितीनुसार हे प्रमाण सर्वसाधारण स्वरूपाचे आहे.

नगरमध्ये मे महिन्यात एकूण ८० हजार ७८५ नागरिकांना मे महिन्यात संसर्ग झाला होता. या तुलनेत बालके बाधित होण्याचे प्रमाण प्रमाण ११.६५ टक्के होते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24