अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :- माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचे बंधू आणि युवा नेते रोहिदास तसंच देविदास कर्डिले यांचे वडील बाबासाहेब उर्फ अप्पा कर्डिले यांचं अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच नगर तालुक्यासह बुऱ्हाणनगर गावात शोककळा पसरली. माजी मंत्री कर्डिले आमदार असताना समाजातील मागील सुख-दुःखाची धुरा सांभाळली होती.
कर्डिले परिवारातला आणि तालुक्यातला एक मुत्सद्दी चेहरा आज काळाच्या पडद्याआड गेला. स्व. कर्डिले यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.