अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-अकोले तालुक्यात कोंभाळणे गावात एका घराला लागलेल्या आगीत संपूर्ण घराची राखरांगोळी झाली होती.
त्याच घरातल्या चिमुरड्याची सायकल जळून खाक झाली होती. ह्या मुलाचा त्याच्या सायकली सोबतचा फोटो काल व्हायरल झाला होता.
त्या चिमुरड्याचा निरागसपणा आणि आपल्या सायकलकडे केविलवाणे पाहणारा फोटो सोशलवर व्हायरल झाल्याने त्याची दखल थेट मंत्री महोदयांनी घेतली आहे.
ते मंत्री दुसरे तिसरे कोणी नसून खुद्द बच्चू कडू आहे. अहमदनगर जिल्हातील अकोले तालुक्यातील कोभाळणे गावातील हातावर पोट भरून संसाराचा गाडा चालवत असतानाच अचानक घरांना आग लागली.
या आगीत घरातील सर्व साहित्यासह चिमुकल्याच्या आवडत्या सायकलचा सांगाडा झाला. सोशल मीडियात हा फोटा पाहून प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या चिमुरड्यासाठी नवीन सायकलही पाठवली आहे. प्र
हारचे अहमदनगर येथील पदाधिकारी यांनी रविवारी तातडीने सर्व साहित्य घेऊन कोभाळणे येथे दाखल झाले.
घर बांधणीसह संसारोपयोगी साहित्याची मदत बच्चु कडू यांच्यावतीने या चिमुकल्याच्या कुटूंबियांना देण्यात आली आहे. तसेच त्यांनी यावेळी आणखी मदतीचा शब्द दिला आहे.