Cibil Score : प्रत्येक बँकेचा कर्जासाठीचा व्याजदर हा वेगळा असतो. तसेच कर्जाची प्रक्रियाही खूप वेगळी असते. परंतु,अगदी सहजरित्या कर्ज मिळवायचे असेल तर गरजेचा असतो तो म्हणजे सिबिल स्कोअर.
म्हणजेच क्रेडिट स्कोअर. एखाद्या चुकीमुळेही सिबिल स्कोअरवर परिणाम होतो आणि स्कोअर कमी होऊ शकतो. त्यामुळे सिबिल स्कोअर म्हणजेच क्रेडिट स्कोअरची काळजी घेणे गरजेचे आहे.
किती असावा CIBIL स्कोअर?
CIBIL स्कोअर हा 700 पेक्षा जास्त असेल तर उत्तम. त्याचबरोबर तुम्ही जर अगोदरच कोणत्याही प्रकारचे वैयक्तिक कर्ज घेतले असेल तर तुम्ही वेळोवेळी त्याचा EMI भरणे गरजेचे आहे.
EMI वेळेवर भरा
जर तम्ही वेळेवर EMI भरला तर त्याचा CIBIL स्कोअरवर परिणाम होत नाही. त्यामुळे तुम्हाला जर तुमचा CIBIL स्कोर सुधारायचा असेल तर तुम्ही तुमचा EMI वेळेवर भरणे आवश्यक आहे.
क्रेडिट कार्ड काळजीपूर्वक वापरा
तसेच क्रेडिट कार्ड अतिशय काळजीपूर्वक वापरणे गरजेचे आहे. तसेच क्रेडिट मर्यादा पूर्णपणे वापरू नका. गरज नसल्याचं केवळ 30 ते 40 टक्के क्रेडिट मर्यादेचा वापर करा.
एकाच वेळी अनेक कर्ज
अनेकदा काही जण एकाच वेळी अनेक कर्ज घेतात. जर तुम्हीही ही चूक करत असाल तर ती आजच टाळा कारण यामुळे तुमचा CIBIL स्कोर खराब होऊ शकतो. जुन्या कर्जाची परतफेड केल्यानंतर नवीन कर्ज घ्या.