दीड वर्षापासून बंद असलेल्या भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कची दुरावस्था

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- दीड वर्षानंतर सुरु झालेल्या भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क मध्ये मोठी दुरावस्था निर्माण झाली असताना तातडीने या जॉगिंग पार्कची स्वच्छता करुन, सर्व सोयी सुविधा पुरविण्याची मागणी हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने करण्यात आली.

हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या शिष्टमंडळाने छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांची भेट घेऊन सदर प्रश्‍नाचे निवेदन दिले. यावेळी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ समवेत रमेश वराडे, मेजर दिलीप ठोकळ, दीपक बडदे, संपत ओहोळ,

ईश्‍वर गवळी, सर्वेश सपकाळ, शशांक अंबावडे, संपत बेरड, मच्छिंद्र बेरड, राकेश वाडेकर आदी उपस्थित होते. टाळेबंदी नंतर भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क खुले करण्यात आले आहे. आरोग्य उत्तम राहण्यासाठी परिसरातील नागरिक सकाळी व संध्याकाळी व्यायाम करण्यासाठी व मोकळ्या हवेत फिरण्यासाठी येत असतात.

मात्र गेल्या दीड वर्षापासून जॉगिंग पार्क बंद असल्याने अनेक प्रकारे दुरावस्था निर्माण झाली आहे. पाऊसाने लाईटीच्या तारा खांबावरुन खाली तुटून पडल्या आहेत. स्पीकर बंद पडले आहे. ट्रॅकवरची लाल माती वाहून गेली आहे.

चिल्ड्रन पार्क मधील खेळणी व ज्येष्ठ नागरिकांसाठी बसविण्यात आलेल्या व्यायामाचे मशनरी खराब झाल्या आहेत. पार्कमध्ये असलेला कारंजा बंद पडला असून, त्यामध्ये घाण पाणी साचले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कची स्वच्छता करुन, कारंजा, लाईट, विविध खेळणी व व्यायामाच्या साहित्याची दुरुस्ती व्हावी, शौचालयात पाणी व लाइटची व्यवस्था करावी,

21 जून रोजी योग दिवस असून, नागरिकांना योग व प्राणायाम करण्यासाठी एक मोठा ओटा तयार करुन द्यावा, या जॉगिंग पार्कची स्वच्छता व देखभाल करण्यासाठी कर्मचारींची संख्या वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24