Apple : अॅपल प्रेमींसाठी वाईट बातमी! आयफोनपासून ते आयपॅडच्या वाढवल्या किंमती; जाणून घ्या येथे नवीन किमती…

Apple : अॅपलने (apple) नुकतेच नवीन आयपॅड (new ipad) मॉडेल्स लाँच केले आहेत. यामध्ये 10.9-इंच स्क्रीनसह iPad आणि iPad Pro मॉडेलचा समावेश आहे. यासोबतच कंपनीने आपल्या अनेक उत्पादनांच्या किमतीतही वाढ केली आहे. या यादीमध्ये iPad ते आयफोन (iPhone) पर्यंतचा समावेश आहे. ब्रँडने अनेक अॅक्सेसरीजच्या (accessories) किमतीही वाढवल्या आहेत.

तुम्हाला जवळपास सर्व Apple Watch बँडसाठी जास्त पैसे खर्च करावे लागतील. असाच काहीसा प्रकार एअर टॅगच्या (air tag) बाबतीत घडला आहे. अगदी iPhone SE च्या किमतीतही वाढ झाली आहे. अॅपलच्या या उत्पादनांची नवीन किंमत जाणून घेऊया.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आयपॅड मिनी –

आता तुम्हाला आयपॅड मिनीसाठी (ipad mini) 3000 रुपये जास्त खर्च करावे लागतील. iPad Mini हा तुम्ही खरेदी करू शकता असा सर्वात लहान iPad आहे. कंपनीने हा डिवाइस 46,900 रुपये किमतीत लॉन्च केला आहे. मात्र, त्याची किंमत 3000 रुपयांनी वाढून 49,900 रुपये झाली आहे.

Apple iPad Air –

Apple iPad Air साठी आता तुम्हाला 5000 रुपये अधिक खर्च करावे लागतील. Apple ने यावर्षी M1 चिपसेटसह iPad Air लाँच केले आहे. हे उपकरण 54,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत येते. ते खरेदी करण्यासाठी तुम्हाला आता 59,900 रुपये खर्च करावे लागतील. कंपनीने आपल्या एंट्री लेव्हल उपकरणांच्या किमतीतही वाढ केली आहे.

iPad 9th generation –

iPad 9th generation साठी ग्राहकांना 3 हजार रुपये अधिक खर्च करावे लागतील. हे उपकरण आता 33,900 रुपयांना मिळेल.

iPhone SE 2022 –

iPhone SE 2022 ची किंमतही वाढली आहे. कंपनीने या उपकरणाची किंमत 6000 रुपयांनी वाढवून 49,900 रुपये केली आहे. ही किंमत फोनच्या 64GB स्टोरेज वेरिएंटसाठी आहे.

त्याच वेळी, स्मार्टफोनचा 128GB स्टोरेज वेरिएंट 54,900 रुपयांमध्ये येत आहे, तर 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 64,900 रुपये असेल.

Apple AirTag –

Apple AirTag साठी वापरकर्त्यांना आता 300 रुपये अधिक खर्च करावे लागतील. आता एअरटॅगची किंमत 3490 रुपयांवर गेली आहे.

अॅपल वॉच –

दुसरीकडे, अॅपल वॉचसाठी वापरकर्त्यांना आता 600 रुपये अधिक खर्च करावे लागतील.