अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- केंद्रातील भाजपा सरकारने इंधन दरवाढ, आवश्यक खाद्यतेल, खते व बी- बियाणाची मोठी दरवाढ केली आहे. यामुळे जनमानसात संतापाची लाट उसळली आहे.
सर्वसामान्य नागरिक व शेतकरी यांना वेठीस धरले. या महागाईच्या विरोधात पाथर्डी तालुका काँग्रेस कमिटीने काँग्रेस कार्यालयापासून ते खरेदी विक्री संघाच्या पेट्रोल पंपापर्यंत महागाई विरोधात ‘ढोल बजाव ‘ आंदोलन केले.
दरम्यान केल्या.तहसिलदार शाम वाडकर यांना महागाईचे निवेदन देण्यात आले. दरम्यान काँग्रेसतर्फे आयोजित करण्यात आलेल्या
या आंदोलनात पाथर्डी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा अहमदनगर अल्पसंख्याक काँग्रेस जिल्हाकार्याध्यक्ष नासिर शेख, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस जालिंदर काटे,
नवाब शेख, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष प्रकाश शेलार, रवींद्र पालवे, वसंत खेडकर यांच्यासह इतर उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या गलथान कारभारा विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.