अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:-रेखा जरे हत्येचा मुख्य आरोपी बाळ बोठे याला शहरातील तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आरोपी बोठे याच्याविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल आहे. रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार असणाऱ्या बाळ बोठेला पोलिसांच्या पथकाने हैदराबाद येथून मोठ्या शिताफीने पकडल्यानंतर त्याला पारनेर न्यायालयात हजर करण्यात आले होते.
न्यायालयाने त्याला दोनदा पोलिस कोठडी सुनावली त्यानंतर बोठे याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर महिला लैंगिक अत्याचार व विनयभंगप्रकरणी बोठे याला कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतली होती.
यानंतर त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.या कोठडीची मुदत संपल्याने आज बोठे याला पुन्हा नगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली मात्र,
या आधीच मंगल भुजबळ यांनी बोठे याच्यावर तोफखाना पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता यामुळे बोठे याला ताब्यात घेण्यासाठी तोफखाना पोलिसांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता.यामुळे बोठे याला तोफखाना पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.