बाळासाहेब थोरात म्हणाले ‘सर्वांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला पण….

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:- जिल्हा बँक ही सर्वसामान्य शेतकऱ्यांची बँक आहे. त्यामुळे राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून आम्ही सर्व एकत्र येत आहोत सर्व ठिकाणी राजकारण करत नसते संस्था टिकल्या पाहिजेत यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला.

सहकार क्षेत्रात काम करत असताना राजकीय पक्ष विरहित काम करावे लागते. त्यामुळे जिल्हा बँकेसाठी ही आम्ही कुठलेही राजकारण न करता सहमतीने निवडणूक कशी पार पाडता येईल यासाठी प्रयत्न केले आहेत . अनेक तालुक्यांमध्ये बँकेचे निवडणुकीसाठी मेळ घालण्याचा प्रयत्न केला असून यामध्ये बर्‍यापैकी यश आले असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24