अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- निष्काळजीमुळे ग्रामीण भागात कोरोना वाढला. मास्क वापरणे गरजेचे आहे. गावे कोरोनामुक्त करण्यासाठी काळजीपूर्वक काम करा.
शिथिलता नको, अशा सूचना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी अमृतवाहिनी कॉलेजमध्ये आयोजित आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या.
आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे, सभापती सुनंदा जोर्वेकर, उपसभापती नवनाथ अरगडे, उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे,
पोलिस उपअधीक्षक राहुल मदने, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार जऱ्हाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कचेरिया,
अभियंता आर. आर. पाटील, पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख, पांडुरंग पवार, अनिल शिंदे यावेळी उपस्थित होते. मंत्री थोरात म्हणाले, प्रत्येक गाव व तालुका कोरोनामुक्त करायचा आहे.
ग्राम रक्षक सुरक्षा समिती अधिक प्रभावीपणे कार्यान्वित करत लक्षणे आढळल्यास विलगीकरण करा. तपासणी, विलगीकरण व तातडीचे उपचार कोरोना मुक्तीचा मार्ग आहे. मात्र काळजी घेतली पाहिजे. समारंभ व गर्दी केल्याने धोका वाढू शकतो.