बाळासाहेब थोरात एक वर्षाचं मानधन सीएम रिलीफ फंडात देणार !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :-  राज्यातील कोरोनाचं वाढतं संकट आणि लसीकरणावर येणारा खर्च या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सर्व आमदारांनी त्यांचं एक महिन्याचं मानधन सीएम रिलीफ फंडात देण्याचा निर्णय घेतला आहे.

मीही एक वर्षाचं मानधन देणार आहे. तसेच महाराष्ट्र काँग्रेसकडून सीएम रिलीफ फंडात 5 लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे, तशी माहिती काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

तसेच आमच्या अमृत उद्योगातील पाच हजार कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्चही सीएम रिलीफ फंडात देणार असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. सर्वांचे मोफत लसीकरण झालं पाहिजे यासाठी आम्ही आग्रही आहोत. यापूर्वीचे लसीकरणही मोफत झालं आहे. त्यामुळे आम्हीही मोफत लसीकरण करणार आहोत.

यावर मोठा खर्च येणार आहे. त्यामुळे मी माझं एक वर्षाचं मानधन मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहे. काँग्रेसचे सर्व आमदारही त्यांचं एक महिन्याचं मानधन मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहेत.

तसेच महाराष्ट्र काँग्रेसच्यावतीने मुख्यमंत्री सहायता निेधीला पाच लाख रुपये देण्यात येणार आहेत, असं सांगतानाच सीएम रिलीफ फंडाला निधी देण्यासाठी नागरिकांनी पुढे यावं असं आवाहन थोरात यांनी केलं.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24