भेसळयुक्त बियाणांमुळे बळीराजाची होतेय फसवणूक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :-कोरोना महामारी त्यानंतर गेल्या वर्षी आस्मानी संकट यामुळे बळीराजा आधीच हतबल झाला होता. यामध्ये बळीराजाला मोठ्या आर्थिक नुकसानाला देखील समोर जावे लागले.

संकटाचा सुरु असलेला पाढा बळीराजासमोर अद्यापही कायम आहे. नैसर्गिक संकटाशी मुकाबला करण्याऱ्या बळीराजाला आता निकृष्ठ बियाणे विकणाऱ्या कंपन्यांशी संघर्ष करावा लागतो आहे.

कांदा बियाणे कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे प्रकार उघडकीस येऊ लागले आहेत. लाल कांद्यात भेसळ असल्याने निम्मा म्हणजे ५० टक्के कांदा पांढरा उगवल्याने राहाता तालुक्यातील शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान या होणाऱ्या गैरप्रकाराबाबत राहुरी तालुक्यातील रामपूरवाडी येथील शेतकरी नीरव प्रवीण ठक्कर यांनी कृषी विभागाकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे.

त्यांनी श्रीरामपूर येथील श्री ॲग्रो एजन्सीकडून प्रदीप सीडस कंपनीचे लाल कांद्याचे पुना फुरसुंगी कंपनीचे २८ किलो बियाणे खरेदी केले. शेतीची मशागत करून कांद्याचे पीक घेतले. सध्या उन्हाळी लाल कांद्याची काढणी सुरू आहे.

ठक्कर यांच्या शेतातील कांद्याची काढणी सुरू असताना पांढराशुभ्र कांदा निघू लागला. लाल कांद्याचे बी पेरले असताना पांढरा कांदा कसा निघाला, असा प्रश्न ठक्कर यांनाही पडला.

त्यांनी याबाबत तातडीने राहुरी तालुका कृषी कार्यालयाकडे तक्रार केली. पदाधिकाऱ्यांनी ठक्कर यांच्या शेतातील कांद्याची प्रत्यक्ष पाहणी केली. यामधील कांदा बियाणे भेसळयुक्त असल्याचा निष्कर्ष समितीने काढला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24