अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :- सध्या नगरपंचायत अंतर्गत शहरात भव्य कॉम्प्लेक्स चे काम प्रगतीपथावर आहे त्यामुळे भाजी मंडई मध्ये फळे विक्रेत्यांना जागा उपलब्ध नाही म्हणून सदरील ठिकाणी हातगाडी लावून फळे विक्री करत आहेत.
मात्र शहरातील नगर पंचायत परिसरात भाजीपाला व फळ विक्रेत्यांमुळे परिसरात वाहतुकीस अडथळा निर्माण होतं असल्याने पोलीस निरीक्षक विजय करे यांनी सकाळी भाजीपाला फळे विकण्यास मज्जाव केला.
यामुळे फळ विक्रेत्यांनी भर रस्त्यावर हातगाड्या लावून पोलीस निरीक्षक यांच्या विरुद्ध निषेध व्यक्त केला.
दरम्यान संतप्त फळे विक्रेत्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय सुखदान यांच्या नेतृत्वाखाली नेवासा पोलीस ठाण्यावर अचानकपणे मोर्चा काढला आणि पोलिसांची धावपळ उडाली.
यावेळी पोलीस निरीक्षक यांनी काही दिवसांचा कालावधी देतो असे सांगितले मात्र शहरात कुठेही जागा पर्यायी जागा तसेच मार्ग निघत नसल्याने काही दिवस याचं ठिकाणी फळे विकण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली.
मात्र मार्ग निघत नसल्याने मोर्चेकरी व पोलीस निरीक्षक यांच्या मध्ये शाब्दिक चकमक पहावयास मिळाली दोन तासानंतर अखेर समंजसपणाने संपुर्ण वादावर पडदा पडला .
पोलिसांनी आपल्या खाकी ची ताकत गोरगरिबांवर न आजमावता शहरातील अवैध धंद्यावर कारवाई करावी शहरात खुलेआम अवैधधंदे सुरू असलेल्या ठिकाणी आम्ही आपल्या सोबत येतो तुम्ही कारवाई करा अश्या शब्दात वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय सुखदान यांनी पोलिसांना सुनावले.