ताज्या बातम्या

१ जुलैपासून सिंगल यूज प्लॅस्टिकवर बंदी, ज्युस प्यायच्या स्ट्रॉचं काय होणार?

Published by
Ahmednagarlive24 Office

India News : १ जुलैपासून भारतात सिंगल यूज प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करण्याचा आदेश केंद्र सरकारने दिला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे पॅक्ड ज्यूस, सॉफ्ट ड्रिंक्स आणि डेअरी प्रोडक्ट बनवणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या कंपन्यांना चांगलाच झटका बसला आहे.

शीतपेय कंपन्या प्लास्टिक स्ट्रॉसह आपल्या वस्तूंची विक्री करू शकणार नाही. सरकारने सर्व सिंगल यूज प्लास्टिकपासून बनलेल्या १९ वस्तूंवर बंदी आणली आहे.प्लास्टिक स्टिक ईयर-बड, फुग्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक कांड्या, प्लास्टिक झेंडे, कॅण्डी स्टिक,

आइस्क्रिम स्टिक, सजावटीसाठी वापरलं जाणारं पॉलिस्टाइनिन (थर्माकोल), प्लास्टिक प्लेट, कप, ग्लास, चमचे, काटे चमचे, चाकू, ट्रे, स्टरर, १०० मायक्रोनहून कमीचं प्लास्टिक किंवा पीव्हीसी बॅनर, मिठाईच्या बॉक्सवरील प्लास्टिक, इन्हिटेशन कार्ड्स, सिगारेट पॅक अशा वस्तूंच्या वापरावर बंदी केली जाणार आहे.

प्लास्टिकऐवजी बांबूपासून बनवलेले चमचे, बांबू स्टिकचा वापर करता येतो. तसंच प्लास्टिक कपच्या जागी कुल्हडचा वापर करता येऊ शकतो. सरकारनेही आता पर्यायी स्ट्रॉ, तसंच इतर वस्तूंवर स्विच करण्यास सांगितलं आहे.

मात्र, स्ट्रॉचे काय करायचे, हा प्रश्न आहे. अमूल, पेप्सिको, कोका-कोला, मदर डेअरी सारख्या अनेक कंपन्या पेय पदार्थ प्लास्टिक स्ट्रॉसह ग्राहकांपर्यंत पोहोचतात. त्यामुळेच अर्थात शीतपेय कंपन्या त्रस्त आहेत.

Ahmednagarlive24 Office