अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. कोरोनाच्या अनेक रुग्नांना वाचविण्यासाठी ऑक्सिजनची अत्यावश्यकता भासत आहे.
यातच जिल्ह्यात ऑक्सिजनचा साठा देखील अल्पसा असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी धावपळ होत आहे. यातच जिल्ह्यातील काही ठिकाणी रुग्णालयांनी एक अजबच फंडा वापरला आहे.
जिल्यासह राज्यात ऑक्सिजन सिलेंडर व बेडच्या तुटवड्यामुळे कोरोनाबाधीत रुग्णांची मोठी हेळसांड होत असून प्राणवायूमुळे रुग्णांची तगमग सुरु असून उपचारा अभावी रुग्ण दगावत असल्याचे चिञ दिसून येत असतांना
आता नेवासा तालूक्यातील काही कोविड रुग्णालयासमोर प्राणवायूच्या कांड्या उभ्या करुन प्राणवायू असल्याचा अभास निर्माण करुन नविनच बनवा बनवी सुरु असून कोरोनाबाधीत रुग्ण दाखल करुन घेण्यासाठी अजब फंडा काही रुग्णालयाकडून केला जात आहे
सध्या कोरोना रुग्णांना बेड व ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे रुग्णालयासमोर उपचारा अभावी रुग्ण दगावत असल्याच्या घटना घडलेल्या आहेत. याचाच फायदा घेऊन नेवासा तालूक्यातील रुग्णांना जिल्ह्यासह बाहेर उपचार घेण्यासाठी जावे लागत असतांना
काही रुग्णालयांनी ऑक्सिजन कांड्या रुग्णालयाबाहेर उभ्या करुन रुग्णांची आता नविनच बनवाबनवी सुरु केल्याची चर्चा रुग्णांच्या नातेवाईकांडून होत आहे.
रुग्णालयात रुग्ण दाखल करुन घेण्यासाठी रिकाम्या ऑक्सिजन कांड्या रुग्णालयासमोर ठेवल्या जात आहेत. हा प्रकारही आता नेवासा तालूक्यात चर्चेचा विषय ठरला जात आहे.