Bank Closed : तुमचा देखील बँकेत काही काम असेल ते पटकन करून घ्या नाहीतर तुम्हाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आम्ही तुम्हाला सांगतो जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात बँकिंगच्या कामकाजात अडचण येऊ शकते.
यामुळे पुढील सलग चार दिवस बँकांच्या कामकाजावर परिणाम होणार आहे. 28 जानेवारीपासून म्हणजेच शनिवारपासून सुरू होणार आहे. महिन्याचा हा चौथा शनिवार असून, बँकांना साप्ताहिक सुट्टी आहे. महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद राहतात. त्यानंतर रविवार, 29 जानेवारीला साप्ताहिक सुट्टी आहे.
2 दिवस संप
यानंतर 30 आणि 31 जानेवारीला बँकांमधील संपामुळे कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) या बँकांच्या संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी 30 जानेवारीपासून दोन दिवसांच्या संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
काय आहे मागणी
बँकिंग संघटना कर्मचाऱ्यांची पाच दिवसांची बँकिंग, पेन्शन अपडेट, नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) रद्द करण्याची आणि पगारात सुधारणा करण्याची मागणी करत आहेत. यासाठी आम्ही संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. संपामुळे बँकिंग कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, याचा ऑनलाइन बँकिंगवर परिणाम होणार नाही.
हे पण वाचा :- Digital Voter ID: फोनमध्ये डिजिटल मतदार ओळखपत्र ‘या’ पद्धतीने करा डाउनलोड ; ‘ही’ आहे संपूर्ण प्रक्रिया