बनावट सोने तारण ठेवून बॅँकेची २७ लाखांची फसवणूक ! वीस जणांवर गुन्हा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-  राहुरी तालुक्यातील तांभेरे येथील जिल्हा बँक शाखेत बनावट सोनेतारण करून बॅँकेची २७ लाख १० हजार रूपयांची फसवणूक केल्या प्रकरणी बॅँकेचे खातेदार असलेल्या राहुरी व राहाता तालुक्यातील वीस जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तांभेरे येथील जिल्हा बँक शाखेचे शाखाधिकारी भाऊसाहेब माधवराव वर्पे यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, या घटनेतील आरोपींनी १ सप्टेंबर २०१९ ते १ जानेवारी २०२० दरम्यान संगनमत करून अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तांभेरे शाखा यांचेकडून वेळोवेळी सोने तारण कर्ज म्हूणन रोख रक्कम घेवून बनावट स्वरूपाचे खोटे दागिने तारण ठेवले. स्वत:हाचे फायदयाकरीता बँकेची फसवणूक केली.

त्यानुसार आरोपी प्रकाश गिताराम पठारे (रा. लक्ष्मीवाडी, रामपुर), पुजा नवनाथ पठारे (रा.लक्ष्मीवाडी, रामपुर), सुनिल उत्तम सरोदे (रा. तांदुळनेर, पो. तांभेरे), मंदाबाई गोपीनाथ पठारे (रा. लक्ष्मीवाडी, रामपुर), मनिषा राहुल पठारे (रा. लक्ष्मीवाडी, रामपुर), अनिल उत्तम सरोदे (रा. मुतांदुळनेर, तांभेरे), राहुल गोपीनाथ पठारे (रा. लक्ष्मीवाडी, रामपुर), प्रविण अरूण शिरडकर (रा. सावता महाराज मंदिर कोल्हार खुर्द), राहुल शांताराम नालकर (रा. लक्ष्मीवाडी, रामपूर, ता. राहुरी), अरूण बाळासाहेब शिंदे रा.रामपुर, ह. रा.वेताळबाबा चौक, पाथरे ता. राहाता),

माया राजेंद्र येळे (रा. सावता महाराज मंदिर, कोल्हार खुर्द), शुभम अंबादास येळे (रा. कानडगांव, ह. मु. हनुमंतगांव), संदिप बाळासाहेब अनाप (रा.अनापवाडी, सोनगांव), पोपट काशिनाथ थोरात (रा. साईदुध संकलन केंद्र, सात्रळ), नवनाथ गोपीनाथ पठारे (रा. लक्ष्मीवाडी, रामपुर), अश्विनी बाळासाहेब पवार (रा.लक्ष्मीवाडी, रामपुर),

रविंद्र बाळासाहेब पवार (रा. लक्ष्मीवाडी रामपुर), बाबासाहेब सखाहरी पठारे (रा.लक्ष्मीवाडी, रामपुर), संजय शंकर चिकणे (रा. लक्ष्मीवाडी रामपुर), गोरक्ष राघुजी जाधव (रा. माउली मंदिराजवळ, माळेवाडी डुक्रेवाडी ता. राहुरी) या वीस जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मधूकर शिंदे हे करीत आहेत. डिसेंबर महिन्यात सोनगांव शाखेत अशाच प्रकारे सुमारे ३४ लाखाला बॅकेची फसवणूक केल्याचे उघड झाले होते. या प्रकरणात २१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

अहमदनगर लाईव्ह 24