महापालिकेला दिली ५० लाख रुपयांची बँक गॅरंटी…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नगर शहरातील जुने दिवे काढून त्या जागेवर नवीन स्मार्ट दिवे बसवण्यात येणार आहेत. दिवे बसवण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी आहे.

या कामापोटी ईस्मार्ट एजन्सीने महानगर पालिकेकडे सुरक्षा ठेव रकमेपोटी ५० लाखांची बँक गॅरंटी गुुरुवारी जमा केली. नगर शहरातील पथदिव्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी महानगरपालिकेने डिबीएफओएमएमटी तत्वावर स्मार्ट एलईडी प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे.

ई स्मार्ट एनर्जी सोल्युशन एजन्सीला हे काम सोपवण्यात आले आहे. शहरातील सध्या अस्तित्वात असलेले दिवे काढून त्याऐवजी स्मार्ट दिवे बसवण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.

नियोजित कामाचा करारनामा करण्यापूर्वी मनपाने संबंधित एजन्सीला ५० लाखांची बँक गॅरंटी जमा करण्याचे आदेश मागील आठवड्यात दिले होते.

संबंधित एजन्सीने गुरुवारी ५० लाखांची बँक गॅरंटी दिली असल्याने, आता करारनामा करण्यात येणार आहे. करारनाम्यात निविदेतील अटी शर्तीही नमूद असणार आहेत.

करारनाम्याचा मसुदा मनपास्तरावर तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतर या कामासाठी संबंधित एजन्सीला कार्यारंभ आदेश दिले जातील.

चार महिन्यांत दिवे बसवण्याचा कालावधी अाहे. काम पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यांनी ही रक्कम पुन्हा संबंधित संस्थेला ही सुरक्षा ठेव परत दिली जाईल.