Bank of India FD : बँक ऑफ इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक आहे. आपल्या ग्राहकांसाठी बँक सतत अनेक सुविधा घेत असते. ज्याचा फायदा सध्या अनेक ग्राहक घेत आहेत. जर तुम्ही या बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
कारण आता या बँकेकडून 501 दिवसांच्या कालावधीच्या शुभ आरंभ ठेवींवरील एफडी दर वाढवण्यात आले आहेत. बँकेच्या या निर्णयाचा फायदा बँकेच्या हजारो ग्राहकांना होणार आहे. या महिन्यापासून हे नवीन व्याजदर लागू झाले आहेत.
बँक ऑफ इंडियाच्या या विशेष योजनेत सामान्य ग्राहकांसाठी 7.15% आणि इतर ज्येष्ठ नागरिक ग्राहकांसाठी 7.65% व्याज दर जाहीर केले आहे.
7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीत परिपक्व होणाऱ्या इतर मुदत ठेवींसाठी, सामान्य ग्राहकांसाठी 3% ते 6.75% आणि अति ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.40% व्याजदर आहे. याबाबत बँकेने एका निवेदनात असे म्हटले आहे की सुधारित व्याजदर देशांतर्गत, NRO आणि NRE ठेवींवर लागू होणार आहेत.
बँक ऑफ इंडियाने पुढे असेही म्हटले आहे की ज्येष्ठ नागरिक/कर्मचारी/माजी-कर्मचारी ज्येष्ठ नागरिकांसाठी लागू अतिरिक्त दराचा लाभ घेण्यासाठी ठेवीचा कालावधी 6 महिने आणि त्यापेक्षा जास्त असावा. ज्येष्ठ नागरिक/ज्येष्ठ नागरिक कर्मचारी/माजी-कर्मचारी हा पहिला खातेदार असावा तसेच जमा करत असताना त्याचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असावे.