अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- तीन वर्षापासून फसवणुकीच्या दाखल दोन गुन्ह्यातील आरोपीला नगरच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दिल्ली येथे जाऊन आरोपीला अटक केली.
प्रसाद बाळासाहेब गुंड, (रा. पुणे, हल्ली रा. दिल्ली) असे आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार अमोल गाडेकर हा फरार आहे.आरोपी गुंड याने नगरच्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतून केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या
बेरोजगारांसाठी देण्यात येणाऱ्या कर्ज प्रकरणात महाराष्ट्र बँकेच्या चितळे रोड शाखेकडून ९८ लाखांचे कर्ज घेतले होते,तर बँक ऑफ महाराष्ट्राच्या नेप्ती शाखेतून त्याच्या साथीदाराने ८० लाखांचे कर्ज २०१५ मध्ये घेतलेले होते,
हे कर्ज घेतल्यानंतर त्यांना एमआयडीसी या ठिकाणी प्लास्टिक पासून पेट्रोल तयार करण्याच्या संदर्भातील प्लांट उभा करायचा होता, मात्र त्यांनी कोणतीच मशिनरी खरेदी न करता रक्कम त्यांनी परस्पर काढून स्वतःच्या दुसऱ्या खात्यात घेतली व ती अन्य कामासाठी वापरली.
बँकेला हप्ते त्यांनी भरले नाहीत, चौकशी केल्यानंतर बँकेची फसवणूक झाली असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तोफखाना पोलिस ठाण्यात या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
तर दुसरा गुन्हा हा नगर तालुका पोलिस ठाण्यात दाखल केला होता. दुसऱ्या गुन्ह्यांमध्ये तीन आरोपी आहेत, ते फरार आहेत.
या घटनेचा तपास करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिल्यानंतर आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या उपअधीक्षक प्रांजल सोनवणे
यांनी या घटनेचा तपास सुरू केल्यानंतर बँकेकडे कागदपत्रांची पडताळणी सुरू केल्यावर गुंड याच्या पत्नीच्या नावानेही कर्ज प्रकरण दुसऱ्या बँकेचे असल्याचे निदर्शनास आले होते.
त्यावरून त्यांनी त्याचा सर्च केला व संबंधित व्यक्ती या दिल्लीत राहत असल्याचे समजले. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी पाठवले. पोलिसांनी संबंधित महिलेचा ठावठिकाणा लावल्यानंतर ते दिल्लीत राहत असल्याचे आढळून आले.
त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर शोधून काढल्यानतर गुंड हा त्याच्या पत्नीच्या संपर्कात असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी कधी ऑपरेटर आहोत तर कधी तर कधी कुरिअर वाले आहोत, असे म्हणत गुंड चा शोध लावला व त्याला दिल्ली येथून अटक केली.